* आमदार नरेंद्र पवारांनी राबवलीलेल्या लोकउपयोगी उपक्रमांचे उद्घाटन
कल्याण / गणेश पोखरकर
शासनाच्या महत्वकांक्षी योजनाचे लोकार्पण आणि भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सामान्य जनतेसाठी राबविलेल्या उपक्रमांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून राज्याचे अर्थमंत्री नामदार सुधीर मुनगुटीवार रविवारी कल्याणात उपस्थित राहणार आहेत. यामध्ये त्यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या पंतप्रधान मुद्रा योजनेचा लोकार्पण सोहळा आणि आमदार पवार यांनी राबविलेल्या आमदार मित्र, करिअर गायडन्स, रोजगार योजना आदी महत्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम कल्याण पश्चिमेतील सनई मंगल कार्यालय सभागृहात सायंकाळी ४.०० वाजता संपन्न होणार आहे अशी माहिती भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांना दिली.
राष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये रोजगार निर्मिती बरोबर देशातील तरूणाईला व्यवसायासाठी प्रोसाहित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान मुद्रा हि महत्वकांक्षी योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून लघु उद्योगासाठी विनातारण सुमारे ५० हजार पासून १० लाखा पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. हीच महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे राबवून कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सुमारे १० हजार गरजू तरुणांना लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निश्चय भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. यासाठी एक विशेष दालन त्यांच्या कार्यालयात सुरु केले असून विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्धतेसाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी २० सीए ची टीम काम करणार आहे. त्याचप्रमाणे या योजने प्रमाणेच आपल्या विधानसभा क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी सामाजिक काम करणार्या व्यक्तींसाठी आमदार मित्र हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. याबरोबर करिअर गायडन्स आणि रोजगार योजने अंतर्गत त्यांच्या कार्यालयात विशेष दालन सुरु करण्यात येणार आहे.
दरम्यान यासर्व उपक्रमांच्या माध्यमातून कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा असा दृष्टीकोन आमदार पवार यांनी डोळ्यापुढे ठेवला आहे. या महत्वपूर्ण योजनांचे लोकार्पण अर्थमंत्री नामदार सुधीर मुनगुटीवार यांच्या हस्ते होणार आहे.