नवी मुंबई : आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टतर्फे सोमवार, दि. ११ जानेवारी रोजी नेरूळमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत व माजी नगरसेविका इंदूमती भगत यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर १२ मधील एनआरबी विद्यालयात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबीर होणार असून या कार्यक्रमात रक्तदान करण्याकरता नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नामदेव भगत यांनी केले आहे.