नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबईतील विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींसमवेत पत्रकारदिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी रबाळे परिसरातील मुंब्रादेवी डोंगरावर जाऊन स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये महापौरांसह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान विभागप्रमुख दादासाहेब चाबुकस्वार यांच्यासह सर्वच पत्रकारांनी व राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभागी घेतला.