नवी मुंबई / सुजित शिंदे
सुप्रसिध्द निवेदक, साहित्यिक व नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडें यांना महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कार २०१६ जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध निवेदक साहित्यिक कवी महेंद्र कोंडे यांना हा १७ जानेवारी रोजी सांयकाळी ५ वाजता शिवाजी मैदान, तलावपाळी समोर, जांभळी नाका, ठाणे (प.) येथे आयोजित एका कार्यक्रमात दिला जाणार आहे.