– पालकमंत्र्यांनी तळ ठोकूनही युतीचा मतदानाचा टक्का घसरला
– स्मार्ट नवी मुंबईकरांनी नाकारला स्मार्ट सिटीचा चुकीचा प्रस्ताव
नवी मुंबई, प्रतिनिधी
नेरूळच्या प्रभाग क्रमांक-८८ मध्ये झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या उमेदवार शिल्पा कांबळी यांचा विजय झाला आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार नुतन राऊत यांचा ७६ मतांनी पराभव केला. कांबळी यांना १८१८ तर राऊत यांना १७४२ मते मिळाली. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सरस्वती पाटील यांना १०२३ मते मिळाली. तर ६६ मतदारांनी मतदानाचा नकाराधिकार(नोटा) वापरला.लोकनेते गणेश नाईक यांच्या विकासाभिमूख कृतीशील विचारांना नेरूळवासियांनी पुन्हा एकदा साथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या दिवंगत नगरसेविका शशिकला मालादी यांना प्रभाग क्रमांक-८८ च्या नागरिकांनी मतदानरूपी श्रध्दांजली अर्पण केली आहे.एकून ९२१५ मतदारांपैकी ४६४९ मतदारांनी आपला हक्क बजावला राष्ट्रवादीच्या मतदानामध्ये २ टक्कयांनी वाढ झाली आहे.
निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी सिडको वसाहतींच्या पुर्नबांधणीसाठी ४ एङ्गएसआयचे खोटे गाजर दाखविले. परंतू नागरिक या आश्वासनाला भुलले नाहीत. जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या पोटनिवडणूकीसाठी प्रभागामध्ये तळ ठोकून बसले होते. तरी देखील युतीच्या उमेदवाराचा मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे नेरूळमधील नागरिकांनी शिवसेना-भाजपा नेत्यांच्या भूलथापांना भिक घातली नाही. स्मार्ट सिटीच्या योजनेवरून विरोधकांनी चुकीचा प्रचार आणि गैरसमज निर्माण करून राष्ट्रवादीला टिकेचे लक्ष केले होते. परंतू लोकनेते गणेश नाईक यांनी त्यांच्या झंझावाती प्रचारसभांमधून विरोधकांच्या सर्व आरोपांमधील हवा काढून घेतली. स्मार्ट नवी मुंबईकरांनी विरोधकांकडून मांडलेला चुकीचा स्मार्ट सिटी प्रस्ताव नाकारला आहे. हे पोटनिवडणूकीच्या निकालावरून पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका मालादी यांच्या आकस्मित निधनाने नेरुळ प्रभागा-८८ मध्ये पोटनिवडणूक लागली होती. आज (ता.१०) रविवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५०.५१ टक्के मतदान झाले. एकूण ९२१५ मतदारापैकी ४६४९ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदान संपल्यानंतर लगेचच सेंट झेविर्यस शाळेमध्ये मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या अंतिम ङ्गेरीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिल्पा कांबळी यांना निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती सांडभोर यांनी विजयी घोषित केले. मतदानाच्या दोन फेर्यामध्ये झालेल्या मतमोजणीत पहिल्याच फेरीत आघाडी घेत कांबळी यांनी विजय मिळविला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी या प्रभागातील राष्ट्रवादीच्या निवडणुक प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक अनंत सुतार, पालिकेतील सभागृह नेते जे.डी. सुतार, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, तालुकाध्यक्ष व नगरसेवक रविंद्र इथापे, महिला अध्यक्षा माधुरी सुतार, युवक अध्यक्ष सुरज पाटील, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जब्बार खान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, विविध तालुक्याध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने, एकजुटीने काम करून पोटनिवडणूकीमधील हा विजय साकारला आहे.
पोटनिवडणुकीमध्ये शहराच्या विकासाला महत्त्व देत मतदारांनी विजयी केले आहे. हा विजय सर्वधर्मसमभावनेची शिकवण देणार्या राष्ट्रवादीचा आहे. बोगस मतदानाचा आरोप करणार्या विरोधकांना आजच्या निकालाने उत्तर मिळाले आहे. स्व.नगरसेविका शशिकला मालादी यांना खरी श्रध्दांजली नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी दिली आहे.-लोकनेते गणेश नाईक.
स्व. मालादी यांच्या आत्महत्या प्रकरणाचे राजकारण आणि बोगस मतदानाचा बागुलबुवा विरोधकांनी प्रचारात केला होता. त्यांना चोख उत्तर मतदारांनी दिले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आता अधिकच वाढली असून आत्तापासून जोमाने कामाला लागले पाहिजे. हा विजय लोकनेते गणेश नाईक यांच्या दूरदृष्टी विचारांचा आहे.- डॉ.संजीव गणेश नाईक, प्रदेश सरचिटणीस.
नवी मुंबईकर जनता ही शहराच्या विकासाला साथ देते हे पुन्हा एकदा पोटनिवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी उमेदवार केवळ जिंकला नाही तर राष्ट्रवादीची मते देखील वाढली आहेत. गेली १५ वर्षे जनतेने लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास आजही कायम आहे.-संदीप नाईक, आमदार .
राष्ट्रवादीच्या रुपाने मला विजयी करुन नागरिकांनी स्व.शशिकला मालादी यांना आज खर्या अर्थाने श्रध्दांजली अर्पण केली आहे. लोकनेते गणेश नाईक यांनी नागरिकांना दिलेले प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे अभिवचन मी पूर्ण करेल आणि या प्रभागातील जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेल-शिल्पा कांबळी, विजयी उमेदवार.
स्व. मालादी यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत नागरिकांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळी यांना विजयी करत स्व.मालादी यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.स्व.मालादी यांचे प्रभागाच्या विकासाचे स्वप्न आम्ही पूर्ण करु-सुरेश शेट्टी, माजी नगरसेवक.
नेरूळ येथील नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळी यांना विजयी करुन लोकनेते गणेश नाईक यांच्या विकासाला साथ दिली आहे. नेरुळ परिसरातील जनतेने राष्ट्रवादीवर टाकलेला विश्वास आणि शहराचा विकास करण्याचे स्वप्न राष्ट्रवादी पूर्ण करेल.-रविंद्र इथापे, तालुका अध्यक्ष, नेरूळ पूर्व.