नवी मुंबई : पाय मोकळे करण्यासाठी घरातून बाहेर पडलेले ७८ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक हरविण्याची घटना नेरूळ सेक्टर सहा परिसरात घडली आहे. हरविलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे वय ७८ वर्ष असून विश्वनाथ सुतार हे नाव आहे.
नेरूळ सेक्टर सहा येथील प्लॉट ४९ वरिल अमृता परॉडाईज येथे राहणारे विश्वनाथ सुतार हे १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडले, ते परत आलेच नाही. अंगावर बनियन व धोतर तसेच गळ्यात तुळशीची माळ असा पेहराव असून डाव्या हातावर उडिसा भाषेत राधा कृष्ण असे लिहीलेले आहे. एक महिन्यापूर्वीच ते नेरूळ सेक्टर ६ येथील महेश्वर सुतार यांच्याकडे रहावयास आले आहेत.
विश्वनाथ सुतार यांचा त्यांच्या घरातील सदस्यांनी सानपाडा ते बेलापुरदरम्यान सर्वत्र शोध घेवून कोठेही न सापडल्याने १ फेब्रुवारी रोजी सारसोळे पोलीस चौकीत व २ फेब्रुवारी रोजी नेरूळ पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. विश्वनाथ सुतार यांना फक्त उडिसा भाषा समजते. हिंदी अथवा मराठी भाषाही त्यांना समजत नाही. कृपय्या त्यांचा कोणास शोध लागल्यास त्यांनी ९८९२१३८८०४, ८४५१८५४५६३ या क्रमाकांवर अथवा नेरूळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन समाजसेवक संजय धोतरे यांनी केले आहे.