ठाणे : डोंबिवलीच्या धनश्रीचा रेल्वेमधून पडून मृत्यू होण्याच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोवर अजून एक युवक ट्रेनमधून पडला. डोंबिवली ते ठाकुर्लीच्या दरम्यान हा युवक सात वाजण्याच्या सुमाराला पडला. त्यानंतर समोर आला तो रेल्वेच्या बेजबाबदारपणाचा नमुना.
कल्याण, डोंबिवली आणि दिवा या स्थानकांवर कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. साधे हमालही लवकर मिळत नाहीत. पोलिसांनाच सर्व धावपळ करावी लागते. हे सगळं झाल्यावर कसंतरी रूग्णालयात गेल्यावरही तिथेही उपचार मिळाले नाहीत.
गाडीतून पडलेल्या या युवकाला शास्त्रीनगर रूग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार झाले पण सिटी स्कॅनिंगची यंत्रणाच नसल्याने युवकाला सायन रूग्णालयात पाठवण्यात आलं. पण बरोबर कोणी डॉक्टर नाही.
केवळ एक हमाल आणि एक पोलीस. वाटेत पेशंटचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याच्याकडे कोण बघणार होतं?. या सगळ्या प्रकारात रेल्वेची भूमिका काहीच नाही.