मुंबई : हार्बर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. घसरलेल्या खडी असलेल्या मालगाडीचा डबा हटवण्यात यश आले आहे.
सीएसटी इथे प्लेटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम सुरु असताना खडी असणार्या मालगाडीचे चाक घसरले होते. त्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून वाहतूक वडाळा ते सीएसटी ठप्प होती.
वडाळा-सीएसटी अप-डाऊन वाहतूक बंद होती. त्यामुळं कुर्ला इथून सेंट्रल मेन लाईनने सीएसटी गाठा अशा सूचना रेल्वेने हार्बरच्या प्रवाशांना दिल्यात. दरम्यान पनवेल-वडाळा वाहतूक सुरु होती. त्यामुळे वडाळ्यापर्यंत प्रवाशांना दिलासा मिळाला.