नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २८ मधील श्री.गणेश सोसायटीमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त श्री गणेश जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत जगत्गुरु श्री. संत तुकाराम महाराज यांच्या संपूर्ण चरित्रावर कथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सव सोहळ्यात पहाटे ४ ते ६ काकड आरती, दुपारी ५ ते ६.३० हरिपाठ, सांयकाळी ६.३० ते ७ श्रींची आरती, सांयकाळी ७ ते १० कथा पठन असे आयोजन करण्यात आले आहे.
११ फेब्रुवारी रोजी ह.भ.प धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० वाजता होणार असून किर्तनानंतर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ४ दरम्यान श्री. सत्यनारायण पुजा, सांयकाळी ५ ते ७ हळदीकुंकू, दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यत श्रींच्या महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
दादर भाजीपाला व्यापारी मित्र मंडळ, श्रीगणेश सहकारी गृहनिर्माण संस्था आणि श्रीगणेश प्रासादिक भजन मंडळ, नेरूळ यांनी संयुक्तपणे या उत्सव सोहळ्याचे आयोजन केले असून माजी उपमहापौर व माजी बाजार समिती संचालक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक अशोक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १५ वर्षे या उत्सव आयोजित केला जात आहे. या श्रीगणेश जयंती उत्सव सोहळ्यात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येेने व भक्तीभावाने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई महापालिकेतील उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती ऍड. सपना गावडे-गायकवाड यांनी केले आहे.