मुंबई – मुंबईच्या विक्रोळीमधील एका घरात सिलिंडर स्फोट होऊन लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. मात्र तिघांना जीव गमवावे लागले. राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु असताना तिघांचाही मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मृतांची नावं..
१. मोहम्मद सलीम बेलीम – वय ८ वर्ष
२. मिराज सलीम बेलीम – वय १५ वर्ष
३. सलमा सलीम बेलीम – वय ४० वर्ष