मुंबई : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात हात होता. याची स्पष्ट कबुली हेडलीने दिली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.
हेडलीच्या सुरू असलेल्या सुनावणीत पाकिस्तानच्या काळ्या कारवायांचा खजीनाच हाती लागत आहे. भारतातील दहशतवादी कारवायांच्यामागे पाकिस्तानचे कसे पाठबळ आहे. याचा पाढाच हेडली वाचत आहे. पाकिस्तानातील ५-६ दहशतवादी कँपना भेट दिल्याचे हेडलीने सांगितले. तसेच स्वतः दहशतवाद्यांसाठीचे, दौरा-ए-सफा, दौरा-ए-खास, दौरा-ए-अम्मा, दौरा-ए-रिबत हे नेतृत्व विकास कोर्स केल्याची खळबळजनक माहितीही त्याने दिली. लष्कर-ए-तयबाचा पहिला कोर्स २००२ साली मुझफ्फराबादमध्ये केल्याचेही हेडलीने सांगितले.
पाकिस्तानी निवृत्त जनरल अब्दुर रेहमान पाशा यांच्यासोबत अफगानिस्तान सीमेवर आपल्याला अटक झाली होती. त्यावेळी मेजर अली यांनी त्यांची चौकशी केली होती. त्यामध्ये, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय माहितीसाठी आपला उपयोग होईल असे अली यांना वाटल्याचे हेडलीने सुनावणीत सांगितले. लष्करचा साजिद मीर कोणते ई-मेल आयडी वापरत होता याची माहितीही हेडलीने दिली. त्यामध्ये लहरश्रलहरश्रेूरहेे.लेा हा ई-मेल आयडी तो वापरत असल्याचे हेडलीने सांगितले. मेजर अली यांनीच आपली ओळख आयएसआयच्या मेजर इक्बाल यांच्याशी करुन दिल्याची कबुलीही हेडलीने यावेळी दिली. आपल्याकडे भारतीय व्हिसा असल्याचे पाहून दोघांनाही आनंद झाला होता असेही हेडलीने सांगितले.
हाफिज सईदच्या भाषणांचा आपल्यावर प्रभाव पडल्याचेही त्याने सांगितले.
हेडलीने २६-११ हल्ल्यापूर्वी ७ वेळा भारताला भेट दिल्याची माहिती सुनावणीत दिली आहे. या हल्ल्यासंदर्भात अबु जुंदालचीही सुनावणी सुरू आहे. त्याचीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबानी नोंदवण्यात येत आहे.
लष्कर-ए-तोयबाचा आपण पाईक होतो अशी स्पष्ट कबुली या सुनावणीत हेडलीने दिली आहे. आपण आपले नाव बदलले असल्याची माहितीही त्याने दिली. लष्करचासहकारी साजिद मीर याला याबाबतची माहिती दिल्याचेही त्याने म्हटले आहे. नाव बदलल्यानंर काही आठवड्यातच पाकिस्तानला भेट दिल्याचेही त्याने सांगितले. भारतात येण्यासाठी नाव बदलल्याचा उपयोग होईल असेही त्याने सांगितले. अमेरिकन नावाने भारतात यायचे होते याची माहितीही हेडलीने दिली. मीर याने आपल्याला मुंबईचे जनरल व्हिडिओ घेण्याची जबाबदारी दिली होती याची कबुली हेडलीने दिली. पाकिस्तानातून सातवेळा भारताला थेट भेट दिल्याचे त्याने स्पष्ट केले. तर एकदा संयुक्त अरब अमिरातीतून भारतात आल्याची माहिती हेडलीने दिली.
हेडलीने त्याच्या सुनावणीत आणखी माहिती उघड केली आहे. त्याच्या मते २६-११ हल्ल्यापूर्वीही दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सप्टेंबरमध्ये पहिला प्रयत्न झाला. मात्र हत्यारांची बोट खडकावर आपटून फुटली. त्यात सगळी हत्यारे गेली. मात्र बोटीवरील सर्वजण वाचल्याचे हेडलीने सांगितले. त्यामुळे हा प्रयत्न फसला. दुसरा प्रयत्न ऑक्टोबरमध्ये झाला. त्यातही हल्ला करण्यात अपयश आल्याचे हेडलीने सांगितले.
यावेळी या खटल्यातील आणखी एकआरोपी अबु जुंदालचीही सुनावणी होत आहे. त्याचीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात येत आहे.
येथील विशेष न्यायालयाच्या माध्यमातून ही सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम कोर्टात उपस्थित आहेत.
मुंबईत २००८ साली झालेल्या हल्ल्यासंदर्भात अत्यंत महत्वाच्या या सुनावणीतून पाकिस्तानी हस्तक आणि पाकिस्तानच्या आयएसआयचा या हल्ल्यातील सहभागाचा मोठा खुलासा या सुनावणीत होण्याची अपेक्षा आहे.
उल्लेखनिय बाब म्हणजे २००८ साली झालेल्या या हल्ल्यात १६४ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच अनेक लोक जखमी झाले