मुंबई- सुप्रसिद्ध उर्दू शायर निदा फाजली यांचे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे. होशवालों को खबर का, आ भी जा ए सुबह आभी जा… या गाजलेल्या गजलांचे ते शायर होते.
गेल्या काही दिवस आजारी असलेल्या फाजली यांनी ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. फाजली यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला होता. त्यांना साहित्य पुरस्काराने आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे पिता मुर्तुज़ा हसन हे सुध्दा कवी होते. त्यांचे बालपण ग्वालियरमध्ये गेले होते. तेथेच त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले त्यानंतर ते शायरीकडे वळाले.