मुंबई – देवनार कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी ५ तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले स्थानिक नगरसेवक सिराज शेख आणि स्थानिक रहिवाशांपैकी रविवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान ४ आंदोलकांची तब्येत खालावल्याने पोलिसांनी त्यांना शताब्दी रुग्णालयात हलविले आहे.
अब्दुल बारी, फैय्याज मेहराज, अफजल नेताजी, महम्मद हुसेन अशी या चार आंदोलकांची नावे असून हे आंदोलन अजूनही सुरू असून जोपर्यंत पालिका आयुक्त लिखित स्वरुपात आश्वासन देत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.