पुणे- अमृता फडणवीस यांच्या समोरच ब्रह्माऋषी गुरुवानंद स्वामी हे आपल्या हाताच्या पंज्यातून मण्याची माळ प्रकट होत असल्याचं उपस्थितांना दाखवीत होतं. तसंच, ती माळ आशीर्वाद आणि प्रसाद म्हणून देण्यात येत होती. काही पुरस्कार मिळवणार्यांनाही माळ हातातून प्रकट करून दिली गेली. ही माळ अमृता फडणवीस यांनीही आशीर्वाद म्हणून घेतली. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम मिनिस्टरच भोंदूगिरीला खतपाणी घालतायेत का?, असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यात अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा लागू आहे. त्यामुळे एका सामूहिक कार्यक्रमात गुरुवानंद स्वामी यांनी हाताच्या पंज्यातून मण्याची माळ प्रकट करणे आणि ते ही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोर हे कितपत योग्य आहे, असं उपस्थितांचं म्हणणं होतं.



