ठाणे : मध्य रेल्वेने विनातिकिट प्रवास करणार्या फुकट्यांकडून गेल्या दहा महिन्यात १०३ कोटी रुपये वसूल केले आहे. अशी माहिती रेल्वे अधिकार्यांनी दिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी तब्बल १५ टक्के या वसुलीत वाढ झाली आहे.
एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत मध्य रेल्वेने केलेल्या कारवाईत हा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी १७ लाख ९१ हजार प्रवाशांकडून वसूल करण्यात आले असून त्यांच्याकडून ८५ कोटी ३९ लाख वसूल करण्यात आले आहेत. वसूल करण्यात आलेल्या दंडातून मध्य रेल्वेच्या महसूलात २१.७४ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात अवैध्यरित्या आरक्षित प्रवास तिकीट दुसर्याला हस्तांतरीत करणाराची ७४७ प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी मध्य रेल्वेने पाच लाख चाळीस हजार रूपये वसूल केली आहेत.