मुंबई : देशविरोधी घोषणा करणार्यांना फोडून काढा, असे राज ठाकरे जेएनयू प्रकरणावर बोलताना म्हणाले. मात्र, राज ठाकरेंनी यावेळी भाजपवरही जोरदार घणाघात केला. कोण देशप्रेमी आणि कोण देशविरोधी, हे भाजपने ठरवू नये. देशभक्तीचे सर्टिफिकेट भाजपने वाटू नये., असे म्हणत राज यांनी भाजपलाही धारेवर धरलं.
* ‘मेक इन इंडिया’वरही टीका
‘मेक इन इंडिया’ हा केवळ इव्हेंट असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. परदेशातील उद्योगपतींना भारतात बोलावण्याऐजी देशातील उद्योगपतींना प्रोत्साहन द्यायला हवं., असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेनेची भूमिकाच तळ्यात-मळ्यातली आहे. शिवसेना विरोधात आहे की सत्तेत, हेच कळत नाहीय, असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली.
* राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे:
* शिवसेना विरोधात आहे की सत्तेत, हेच कळत नाहीय- राज ठाकरे
* अंगलट आल्यानंतर चारा छावण्या पुन्हा सुरु केल्या- राज ठाकरे
* शिवसेनेची भूमिका तळ्यात-मळ्यातली- राज ठाकरे
* दुष्काळ पाहता चारा छावण्या वाढवण्याची गरज – राज ठाकरे
* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यातून गुजरात अजून जात नाहीय – राज ठाकरे
* परदेशातील उद्योगपतींपेक्षा देशातील उद्योगपतींना प्रोत्साहन द्या – राज ठाकरे
* बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद का? मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई का नाही? – राज ठाकरे
* भाजप सरकार दिखावा करण्यात तरबेज – राज ठाकरे
* भाजप सरकारने देशप्रेमीचे सर्टिफिकेट वाटत फिरु नये – राज ठाकरे
* कोण देशप्रेमी आणि कोण देशविरोधी हे भाजपने ठरवू नये – राज ठाकरे
* ‘मेक इन इंडिया’ हा केवळ इव्हेंट – राज ठाकरे
* केवळ मतांसाठी हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला जातोय – राज ठाकरे
* मत विभाजनासाठी सरकार दंगलीही घडवेल – राज ठाकरे
* सुरक्षेकडे कानाडोळा केल्यानेच गिरगावमधील दुर्घटना – राज ठाकरे