नवी मुंबईतील कामगार क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा प्राप्त होण्याची आता वेळ आलेली आहे. नवी मुंबईत कामगार संघटना उदंड झालेल्या असतानाही कामगारांचे प्रश्न काश्मिर प्रश्नांसारखे ‘जैसे थे’ असतानाच गेल्या दोन-अडीच महिन्यापासून महापालिका प्रशासनदरबारी कामगारांच्या समस्यांची निवेदने-तक्रारी दाखल होवू लागली आहेत. वर्तमानपत्रात कामगारांच्या समस्यांच्या, तक्रारीच्या बातम्या प्रसिध्द होवू लागल्या आहेत. कामगार चळवळीतील नावारूपाला येत असलेला नवा तारा रविंद्र सावंत आता कामगार क्षेत्रात सक्रिय झाल्याने हे चित्र नव्याने निर्माण झाले आहे.
रविंद्र सावंत हे नाव आजमितीला तरी नवी मुंबईकरांना अपरिचित असे नाही. नवी मुंबई कॉंग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय असणारे व्यक्तीमत्त्व अशी रविंद्र सावंतांची प्रतिमा आहे. सध्या नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या रोजगार व स्वंयरोजगार सेलचे ते नवी मुंबई अध्यक्ष आहे. नवी मुंबई मागासवर्गीय-इतर मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी महासंघाशी संलग्न झाल्यावर रविंद्र सावंत कामगार क्षेत्रामध्ये कार्यरत झाले. यापूर्वी कॉंग्रेसच्या व्यासपिठावरून बेरोजगारांना महापालिका प्रशासनात कंत्राटी कामगार व कायम कामगार म्हणून रोजगार प्राप्त करून देणे व संबंधित कामगारांना प्रशासन व ठेकेदारांकडून काही त्रास झाल्यास त्यांच्या मदतीला धावून जाणे या माध्यमातून काही प्रमाणात कामगार चळवळीशी तुरळक प्रमाणात रविंद्र सावंत यांचा कामगार वर्गाशी संबंध होता. पण आता कामगार संघटनेच्या माध्यमातून सक्रिय कार्यास सुरूवात झाल्यावर रविंद्र सावंतांची बदललेली कार्यप्रणाली कंत्राटी कामगारांना दिलासा देणारी आहे.
कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे, त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर भेटीगाठी घेणे असा उपक्रम रविंद्र सावंत यांनी सुरू केलेला आहे. यापूर्वीच्या कामगार संघटनांच्या नेतेमंडळींना व पदाधिकार्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात कामगारांना चकरा माराव्या लागत होत्या. परंतु रविंद्र सावंत यांनी महापालिका मुख्यालयातच कामगार संघटनेचे कार्यालय सुरू केले आहे. रविंद्र सावंत आणि त्यांच्या युनियनचे पदाधिकारी कार्यालयीन वेळेत कामगारांना उपलब्ध होतात. कामगारांच्या समस्या संबंधित पालिका अधिकार्यांकडे जावून सोडविता येतात. त्यामुळे कामगारांना आपल्या समस्या तात्काळ सुटत असल्याचा अनुभवही येवू लागला आहे.
रविंद्र सावंत यांनी कामगार क्षेत्रात कार्य सुरू केल्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रातील काही प्रस्थापित कामगार नेत्यांच्या वर्चस्वाला तडा जाणे स्वाभाविकच आहे. कोणाचा तरी उदय हा कोणाचा तरी अस्त करतो हा तर सृष्टीचाच नियम आहे. कामगारांच्या समस्यांना न्याय मिळू लागल्याने अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर पालिकेतील कामगार वर्ग रविंद्र सावंतांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होवू लागला आहे. कामगारांच्या रविंद्र सावंतांकडून अपेक्षा वाढीस लागल्या आहेत. एका कॉंग्रेसी कार्यकर्त्यांचे कामगार नेत्यामध्ये रूपांतर होवू लागले आहे. जो काम करतो, त्याच्याकडूनच समाजाच्या अपेक्षा वाढीस लागतात. सध्या तरी नवी मुंबई कार्यक्षेत्रातील कामगार वर्तुळात रविंद्र सावंतांच्या नेतृत्वाची व कार्याची चर्चा सुरू आहे, ते कामगारांना कितपत न्याय देतात आणि कामगार चळवळ कितपत नावारूपाला आणतात, हे पाहण्यासाठी आपणास काही कालावधीची प्रतिक्षा करावी लागेल.