सुजित शिंदे
नवी मुंबई : महापालिका प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16 परिसरात विकासकामांचा शुभारंभ शुक्रवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते होणार आहे.
सागरदर्शन सोसायटी व अष्टविनायक सोसायटी समोर हेवी ड्यूटी गटर बांधणे आणि स्व. तुकाराम दिघे चौक नामफलक अनावरण या कामाचा शुभारंभ नेरूळ सेक्टर 16 येथील श्री. गणेश मैदानात सकाळी 10 वाजता होणार आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष गणेश भगत यांनी महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादीमय करत 1000पेक्षा अधिक मतांनी खेचून घेतला. तेव्हापासून प्रभागात नेरूळच्या राजकारणात प्रख्यात असणार्या त्रिमूर्तीच्या मार्गदर्शनाखाली विकासपर्व सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, समाजसेवक किसमत भगत, युवा नेतृत्व रविंद्र भगत या त्रिमूर्तीच्या जोडीला नगरसेविका रूपाली भगत असा तोफगोळा राष्ट्रवादीकडे स्थानिक भागात असल्याने परिसरात राष्ट्रवादीचा घरटी जनसंपर्क झालेला पहावयास मिळत आहे.
विकासपर्व शुभारंभास स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गणेशदादा भगत यांनी केले आहे.