सद्यस्थितीतील पाण्याची बिकट परिस्थिती लक्षात घेता होळी / धूलिवंदन सणानिमित्त नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करावी असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जात असून काही भागामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी घेऊन वितरीत केले जाते.यावर्षी संपूर्ण राज्यात तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रामध्ये अत्यंत कमी पाऊस झालेला असल्याने धरणामध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध असून तो पुढील पावसाळयापर्यंत पुरविणे आवश्यक आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेकडून पाणी पुरवठ्यामध्ये साधारणत: 30 टक्केपेक्षा अधिक पाणी कपात करण्यात आलेली असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण क्षेत्रामध्येही यावर्षी कमी पाऊस झाला असल्याने त्यांच्यामार्फतही मोठया प्रमाणात पाणी कपात करण्यात आलेली आहे.ही परिस्थिती लक्षात घेता यावर्षी होळी / धूलिवंदनच्या दिवशी म्हणजेच 23 व 24 मार्च 2016 रोजी दैनंदिन नियमित पाणी पुरवठयाव्यातिरिक्त कोणताही अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात येणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी व होळी / धूलिवंदन सण साजरा करताना पाण्याचा अपव्यय आणि अनावश्यक वापर टाळावा तसेच काळजीपूर्वक पाण्याची बचत करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर श्री. सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Click here to Reply, Reply to all, or Forward
|