मुंबई – : अॅपल कंपनी आपला सर्वात स्वस्त iPhone SE आज (सोमवार) लॉन्च करणार आहे. सिलिकॉन व्हॅली येथील अॅपल ऑडिटोरियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटाला नवा iPhone SE सादर करण्यात येईल. iphone SE मध्ये iphone 6 सारखे फीचर्स असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गेल्या काही महिन्यांपासून अॅपलच्या 4 इंचाच्या आयफोनवरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या नव्या iphone SEच्या नावातला S म्हणजे स्पेशल आणि E म्हणजे एडिशन आहे. त्याचबरोबर, मिळालेल्या माहितीनूसार या मोबाईलची किंमत 400 ते 500 डॉलर म्हणजेच 25 हजार ते 33 हजार रुपयांपर्यंत असू शकते.चार इंचाचा डिस्प्ले असलेल्या या आयफोनमध्ये अॅपल प्ले, एनएफसी, एलटीई कनेक्टिव्हिटी असेल. नव्या आयफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि A9 SoC प्रोसेसर दिला जाणार आहे. 1 जीबीचा रॅम असेल, अशीही चर्चा आहे.दरम्यान, अॅपल या इव्हेंटमध्ये आपले अनेक प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. यात छोटा iPad Pro चा समावेश आहे. याचा स्क्रीन साइज 9.7 इंच असेल. यापूर्वी लॉन्च केलेल्या iPad -Pro ची साइज 12.9 इंच आहे.
कसा असेल iPhoneSE?
– iPhoneSE हा फोन iPhone5S सारखा दिसणारा असेल
– iPhone SE चा डिस्प्ले 4 इंचाचा असेल
– या iPhoneला पॉवर बटन स्क्रीनवर नसून बाजूला असेल
– iPhoneSE मध्ये 6Sची टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे
– 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा असण्याची शक्यता आहे
– 4 इंचाचा स्मार्टफोन हॉट पिंक व्हेरिएंटमध्ये लॉन्च होणार आहे
– त्याचबरोबर, iPhoneSE ग्रे किंवा सिल्व्हर रंगातही उपल्बध असेल
– iPhone SE ची किंमत 400 ते 500 डॉलर म्हणजेच 25 हजार ते 33 हजार रुपयांपर्यंत असू शकते