नवी मुंबई : हाच तो सुवर्णदिवस दि-३० मार्च ई.स १६४५ रोजी छत्रपती शिवरायांनी रोहीडेश्वराला अभिषेक घालुन रयतेला गुलामगिरीतुन मुक्त करण्याची हिंदवी स्वराज्य स्थापण्याची शपथ घेतली आणि याच ऐतिहासीक सुवर्ण दिनाचे औचित्य साधुन आज सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र आयोजीत मिशन ३०० संकल्प स्वराज्य सिध्दीचा या उपक्रमाअंतर्गत बुधवारी दुपारी ४ वाजता बेलापुर किल्ल्यासह महाराष्ट्रातील ३०० गडकिल्यांवर भगवा ध्वज स्तंभासहीत फडकवला तसेच दुर्गसंवर्धन मोहीम राबवत हिंदवी स्वराज्यासाठी रक्ताच पाणी करणार्या तमाम मावळ्यांना, आणि हिंदवी स्वराज्याचे सुवर्णशिल्प असलेल्या सर्व गडकिल्यांना देणार एक आगळी-वेगळी मानवंदना देण्यात आली. यावेळी भारत माता की जय, जय भवानी – जय शिवाजी अशा घोषणा देऊन आजुबाजुचा परिसर दणाणून सोडला.
सदर उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या संकल्पनेतून व आमदार संजय मुकुंद केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उस्ताहत पार पडला. हा उपक्रम यशस्वी करण्यात दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष कु. गणेश रघुवीर, कार्याध्यक्ष निलेश जेजुरकर, प्रवीण शिर्के यांनी अथक परिश्रम घेतले सदर मोहिमेत योगेश हेळकर (युवा नेते), महेश डेरे (अध्यक्ष – शिव-शंभो ढोल ताशा पथक, ठाणे) कु. मयूर धुमाळ, कु. तुषार सुळके, कु. तुषार कोंढाळकर, कु. सुरज नाईकरे, सौ. मानसी पाठक, सौ. प्रियांका वाडगये, श्रीमती ज्योती चिवे, सौ. मंगल घरत, कु. रोहित कोळेकर, कु. विशाल साबळे, कु. अजय बर्गे, राजमुद्रा प्रतिष्ठान – जुई नगर, शिव-शंभो ढोल ताशा पथक, ठाणे तसेच सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्रचे कायर्र्कर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.