मुंबई – : चेंम्बुर भागातील सुमन नगर येथे एका तरुणीवर भरदिवसा चाकू हल्ल्याची घटना घडलीये. या हल्ल्यात 22 वर्षीय करिश्मा माने हिचा मृत्यू झालाय.
चेंम्बुर परिसरातील सुमननगर भागात राहणारी करिश्मा माने ही तरुणी कामावर जात असताना सकाळी 10 च्या सुमारास अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ एका तरुणाने चाकू हल्ला केला. जखमी अवस्थेत या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस तपास करत आहे. हा हल्ला नेमका का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये.