नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५-८६च्या वतीने दहावी व बारावीच्या परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १५ जुन रोजी कुकशेतच्या पालिका शाळेत आयोजित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात संध्याकाळी ६ ते ७.३० दरम्यान १० वी व १२वी नंतर भविष्याची निवड कशी करावी याबाबत मार्गदर्शनाकरता आचार्य कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड, बी.एम.पाटील, सुशांत तांडेल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सांयकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान गणेश नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील यांनी दिली.