वटपौर्णिमा निमित्त वडाच्या झाडांचे रोपण
कल्याण : सत्यवणाच्या प्रणासाठी यमाला रोखून त्यांच्याकडून पतीचे प्राण मिळवणाऱ्या सावित्रीची आख्यायिका आहे. या निमित्ताने पतीच्या दिर्घा आयुष्यासाठी वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा सौभाग्यवती महिला करतात. शहरी भागात या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात वटवृक्ष तोडून त्यांच्या फादयांची पूजा केली जाते. या पारंपरिक व्यवस्थेला फाटा देत कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांच्या सुविद्य पत्नी आणि भाजपाच्या महिला आघाडी सरचिटणीस हेमा पवार यांनी महिलांसमवेत बेतूरकर पाडा परिसरातील माता रमाबाई आंबेडकर उद्यानात वटवृक्षांचे रोपण करीत अनोख्या पद्धतीने वटवृक्षांचे पूजन केले. वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प यावेळी सर्व उपस्थित महिलांनी केला.
पर्यावरणाच्या हानीचा फटका दुष्काळाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला दिसून आला आहे. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी वेळोवेळी वृक्षरोपणाचे काम हाती घेतले आहे. याच माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी वटपौर्णिमा निमित्त आमदार पवार यांच्या पत्नी तथा भाजपा महिला आघाडी शहर सरचिटणीस हेमा नरेंद्र पवार यांनी माता रमाबाई आंबेडकर उद्यानात वडांच्या झाडांचे रोपण करून त्याच्या सामूहिक पूजेचे आयोजन केले होते. यावेळी महिलांनी उद्यानात १० वडांची झाडे लावून त्यांची पूजा करीत पर्यावरण आणि पतींच्या दिर्घा आयुष्यासाठी पूजा केली. पर्यावरण वाचले तरच हि सजीव सृष्टी वाचणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामुळेच वटपौर्णिमा निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती हेमा पवार यांनी माध्यमांना दिली.