नेरूळ : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त नेरूळ गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नगरसेवक व नवी मुंबई मनपाचे विद्यार्थी युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश म्हात्रे यांनी आयोजित केलेले आधार कार्ड व स्मार्ट आधार कार्ड शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. या शिबिराला नेरूळवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नेरूळ येथील प्रभाग ९३ व ९५ मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २१ जून ते २३ जून या तीन दिवसाच्या कालावधीत नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या सेक्टर २० येथील जनसंपर्क कार्यालयात नोंदणी सुरू होती. एकूण ३८८ नागरिकांनी स्मार्ट आधारकार्ड आणि १८२ नागरिकांनी आधार कार्डची नोंदणी केली. शेवटच्या दिवशी नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे संध्याकाळी उशिरापर्यत हे शिबिर सुरू ठेवण्यात आले होते. ज्या नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता आला नाही. त्या नागरिकांसाठी जुलै महिन्यात पुन्हा शिबिर राबविण्यात येईल, असे आश्वासन नगरसेवक म्हात्रे यांनी दिले आहे.