अनंतकुमार गवई
नवी मुंबईः नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या जाणून घेत, सूचना-संकल्पना ऐकत त्यावर कार्यवाही करण्यात येणार्या नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आत्तापर्यंतच्या विविध विभागांतील सातही ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांप्रसंगी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. याशिवाय उर्वरित विभागांतील नागरिक आमच्या विभागातही महापालिका आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम घ्यावा अशी दूरध्वनी, पत्रे, ई-मेल याव्दारे विनंती करीत आहेत.
या उपक्रमाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे सर्वच विभागात नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. येत्या २३ जुलै २०१६ रोजी सकाळी ६.३० वाजता सीवूड सेक्टर- ५० मधील ज्वेल ऑफ नवी मुंबई, पामबीच वॉटर बॉडीजवळ ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमातर्ंगत महापालिका आयुक्त तुकाराम
मुंढे महापालिका अधिकार्यांसह उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नागरिकांनी आपल्या तक्रारी/सूचना/संकल्पना महापालिका आयुक्तांपुढे सादर करण्यासाठी लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात आणि त्या ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून उपस्थित असणार्या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा तसेच टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.