नवी मुंबई: नेरुळ पोलिसांनी शिरवणे गावातील किरण बारवर छापा मारुन तेथे अश्लिलल हावभाव आणि अंगविक्षेप करुन डान्स करणार्या तीन बारबालांसह बार मधील इतर ४ कामगारांना अटक करण्याची कारवाई केली आहे.
शिरवणेतील किरण बारमध्ये काम करणार्या महिला वेटरकडून ग्राहकांना हावभाव आणि अंगविक्षेप करण्यात येत असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे आणि त्यांच्या पथकाने २४ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शिरवणेतील किरण बारवर छापा मारला. यावेळी सदर बारमध्ये काम करणार्या महिला वेटर या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आश्लल हावभाव तसेच अंगविक्षेप करुन भिभत्स वर्तन आणि डान्स करताना आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी तीन बारबालांसह बारमध्ये काम करणारे वेटर, कॅप्टन, मॅनेजर, डिजे चालक या चौघांविरोधात महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि बाररुम मधील अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत असलेल्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केली आहे.