नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रं ८७च्या वतीने गुरूवारी (दि. २८) नेरूळ सेक्टर ८ परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर ८ मधील एमजीएम शाळेजवळील ओजस मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ऍण्ड आय.सी.यू या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत हे आरोग्य शिबिर चालणार असून यामध्ये मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, ई.सी.जी व हाडांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच इतर आजारांवरही मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियाही सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.
शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार असून बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, महिला जिल्हा संघठक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने, महिला शहर संघठक रोहीणी भोईर, उपशहरप्रमुख गणपत शेलार उपस्थित राहणार आहेत.
विभागप्रमुख गणेश घाग, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, महिला विभाग संघठक सत्वशीला जाधव हे या कार्यक्रमाचे निमत्रंक असून शाखाप्रमुख बाळू घनवट या कार्यक्रमाचे व्यवस्थापक आहेत. स्थानिक नगरसेविका सुनीता रतन मांडवे व माजी नगरसेवक रतन मांडवे हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. नेरूळवासियांनी या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होवून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा सेनेचे उपशहर अध्यक्ष निखिल मांडवे यांनी केले आहे.