सुवर्णा कांबळे (वय २७) असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर ४ परिसरात राहाणारी सुवर्णा कांबळे या आजारी होत्या. त्यामुळे अंबरनाथ पोलीस ठाण्याचा बाजुला असलेल्या आशीर्वाद रुग्णालयात मागील आठवड्यापासून उपचार घेत होत्या. दरम्यान, तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुवर्णा ही एमबीएची विद्यार्थ्यीनी होती. सुवर्णाचे आत्महत्या करण्याचे कारण आद्यप समजले नाही. त्याबाबत अंबरनाथ पोलीस तपास करीत आहेत.