बेलापूरमधील सायन पनवेल मार्गावरील एका बाजूचा ओव्हर लाइनची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी मिळले बाकी आहे. तळोजामधील मुम्ब्रा-पनवेल रेल्वे मार्गावर १०० मीटर लांबीचा पुलासाठी रेल्वेची परवानगी प्रलंबित आहे. या महत्वाचा परवानग्या मिळाल्यानंतर २०१७ च्या अखेरीस पाहिल्या टप्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याच रेल्वे प्रकल्प अधिकारी कांबळे यांनी सांगितले. त्यानंतर सुरक्षेबाबातच्या चाचण्या घेऊन रेल्वे मंत्रालायकडून अंतिम परवानगी मिळाण्यास २०१८ चा शेवट उजाडेल, अशी शक्यताही कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे अडीचशे कोटीचा हा प्रकल्प ३ हजार ४३ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता सिडकोने व्यक्त केली आहे.
बेलापूर-पेंधार, पेंधार-कळमबोली, आणि कलंबोली-खांडेश्वर या तीन टप्यात हा प्रकल्प होणार आहे.
या मेट्रोवरील स्थानके खालीलप्रमाणे –
बेलापूर, आरबीआई कॉलानी, बेलपाडा, उस्तव चौक, केंद्रीय विहार, खारघर गाव, सेन्ट्रल पार्क, पेठ पाडा, अमन दूत, पेठाली, तळोजा-पेंधार.