सुजित शिंदे : 9619197444
उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिलेंचे जनतेसाठी आक्रमक पवित्रा
नवी मुंबई : वाढीव बिलाच्या समस्याना काही महिन्यापासून ऐरोली मधील जनतेला सामोरे जावे लागत आहे,या गंभीर प्रश्नासंबंधी मंगळवारी मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली एमएसईडीसीच्या कार्यालयावर टाळा बंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी एमएसईडीसीचे अधिकारी महाजन यांनी या कंत्राटदार कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येणार असल्याचे तसेच पुढील महिन्यासाठी पुष्पक कंपनी बघणार आहे असे सांगण्यात आले,आणि लवकरच एमएसईडीसीचे हे अॅप येणार असून ते प्रत्येक ग्राहकाच्या मोबाईल वर येणार आहे असे अधिकार्यांनी सांगितले.तसेच ज्याचे वाढीब बिल आले आहेत त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल.तसेच महावितरण च्या माध्यमातून एमएसईडीसीची भूमिका करणार्या एजंटला मनसैनिकांनी फैलावर घेतले व ऑफिस बाहेर काढले. यावेळी निलेश बाणखेले यांच्याकडून अधिकार्यांना फुल व बिल भेट देण्यात आले
यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, चंद्रकांत महाडिक, विभाग अध्यक्ष रुपेश कदम, मनविसे शहर सचिव प्रेम दुबे, मनविसे उपशहर अध्यक्ष प्रिन्स सिंग, रितेश खुडे, शाखा अध्यक्ष प्रवीण घोगरे पाटील, प्रवीण फापाळे, निखिल थोरात, रमेश वाघमारे, चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते.