-
‘सेव्ह द सोल’ आयआयटी मुंबईचा उपक्रममुंबई: केवळ मनोरंजनासाठी चेन्नईत श्वानाला गच्चीवरुन अमानुषपणे फेकून देण्यात आले. या घटनेनंतर भटक्या श्वानांच्या संरक्षणार्थ आयआयटी मुंबईने पुढाकार घेत ‘सेव्ह द सोल’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून भटक्या कुत्र्यांसाठी आयआयटीअन्स काम करणार आहेत. आयआयटीतर्फे ‘टेक फेस्ट’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवात आणखी एका सामाजिक उपक्रमाची भर पडली आहे. रात्रीच्या वेळी अपघात होऊन अनेक श्वानांचे प्राण गेले आहेत. अनेक प्राणी मित्र संघटन आणि आयआयटीने एकत्रितपणे अहवाल तयार केला आहे. यानुसार वर्षाला तब्बल २० हजार श्वानांचा अपघातामुळे मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे ‘सेव्ह द सोल’ या उपक्रमांतर्गत श्वानांसाठी विशेष गळ््यातील पट्टे बनविण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी गळ््यातील पट्टे चमकतील अशी तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. आयआयटीएन्स तर्फे मुंबईतील तब्बल ६०० श्वानांना पट्टे घालण्यात येणार आहे. आणि पुढील काळात उपनगरातील श्वानांपर्यंत हे विशेष पट्टे पुरविले जाणार असल्याची माहिती आयआयटीकडून देण्यात आली आहे.
शिवाय श्वानांसोबत होणा-या विकृत प्रयोगांना रोखण्यासाठी तब्बल १ लाख विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहिम राबविली होती. ही कागदपत्र संबंधित अधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. यावर लवकरात लवकर कारवाई केल्यास श्वानांवर होणा-या अत्याचारांमध्ये घट होईल असा आशावाद आयआयटी मुंबईच्या टेक फेस्ट समूहाने व्यक्त केला आहे