अरूण दुबे हे एका खासगी बँकेत कामाला असून, त्याच्यावर लोनच्या अर्जाबाबत शहानिशा करण्याचे काम आहे. काही दिवसापुर्वी ४२ वर्षीय महिला कर्ज घेण्यासाठी बँकेत आली होती. त्या महिलेशी दुबे यांची ओळख झाली. त्याने काही दिवसात लोन मिळवून देतो, असे सांगुन त्या महिलेशी जवळीक साधली. या काळात तो तिच्या घरी ये-जा करत असे. महिला घरात एकटी असल्याचे बघून त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देखील दिली.
दुसरीकडे, दुबेकडून लोन संदर्भात कोणतेही कारवाई होत नव्हती. लोन देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यामुळे महिलेने वर्सोवा पोलिसांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगून दुबे विरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.