आमदार नरेंद्र पवार आयोजित गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला
कल्याण : जीवनात यशस्वी होण्यासाठी का्य करायचे किंवा का्य नाही या बाबत विद्यार्थ्यानी निश्यित ध्येय डोळ्यासमोर ठेवले, तर त्याना उच्च शिखर गाठण्यास कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी ध्येयवादी व्हा असा मौलिक सल्ला देत आमदार नरेंद्र पवार यानी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यानी विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या. रविवारी ७ ऑगस्ट रोजी दोन सत्रात कल्याण शहरात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकाशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून भा ज पाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याण शहरातील दहावी ,बारावी परीक्षेत व् अन्य क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व् त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा टिटवाळा ,कल्याण येथील खडकपाडा व चिकणघर या परिसरात विविध सभागृहात राज्यमंत्री रविन्द्र चव्हाण ,खासदार कपिल पाटिल यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. याप्रसंगी टिटवाळा येथे दीडशे ,खडकपाडा व चिकणघर परिसरातील सुमारे सहाशे असे एकुण नऊशे विद्यार्थ्यांचा व् पालकांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र पवार यानी आयोजित केलेल्या उपक्रमाची माहिती देत आलेल्या मान्यवारंचे आभार मानले व सर्व पालकाना शुभेच्या दिल्या. खासदार कपिल पाटिल यानी देखिल यावेळी या उपक्रमाला शुभेच्या देत उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व पालकांना शुभेच्या दिल्या .
दरम्यान यावेळी शिक्षण मंडळ सभापती दया गायकवाड, जिल्हा चिटणीस शिवाजी आव्हाड ,शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे ,युवा मोर्चाचे प्रदेश सचिव निखिल चव्हाण, राजाभाऊ पातकर, देवानंद भोईर, डॉ शुभा पाध्ये, नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेविका उपेक्षा भोईर, नगरसेवक सचिन खेमा, नगरसेवक वरुण पाटील, सदानंद कोकणे,अनिल चौधरी, अमित धाक्रस ,शरद वायुवेगला ,कैलास निचिते ,कल्पेश जोशी ,डॉ राजू राम ,आसिफ झोजवाला , महिला आघाडीच्या पुष्पा रत्नपारखी,भावना मानरजा ,साधना गायकर ,कांचन खरे, रेखा तारे आदिसह परिक्षेत्रातिल असंख्य भा ज पा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.