नवी मुंबई : गौरी-गणपतीच्या सणानिमित्त नवी मुंबईतील सर्व शाळांना ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर अशी 5 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी नवी मुंबई म.न.वि.से. चे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी आज नेवदनाद्वारे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाचे शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली .
गणेशोत्सव हा मराठी जनांचा श्रद्धा आणी जिव्हाळ्याचा सण असून गणेशोत्सवात नवी मुंबईतील चाकरमानी व नागरिक कोकणात व महाराष्ट्रात इतरत्र आपाआपल्या गावी जात असतात असे असताना नवी मुंबईतील इंग्रजी माध्यमांच्या शाळा जाणून बुजून गणेशोत्सवकाळात परिक्षांचे आयोजन करीत असल्याचे मनविसेने शिक्षणअधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुंबई आणी ठाणे येथील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या असून त्यासंदर्भात शिक्षण उपसंचालकानी परिपत्रक काढले असताना नवी मुंबईत मात्र मुजोर इंग्रजी शाळा शिक्षण उपसंचालकांच्या परिपत्रकास केराची टोपली दाखवित आहेत . हा सर्व प्रकार संतापजनक असून गणेशोत्सव काळात सुट्ट्या जाहीर न झाल्यास मनविसेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिला .
येत्या 3-4 दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळास दिले . यावेळी शिष्टमंडळात म.न.वि.से. शहरसचिव निखिल गावडे, उपशहर अध्यक्ष सनप्रित तुर्मेकर,उपशहर ,उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे,शाम आरगडे,मनिष वाघ,विराट शृंगारे,प्रतिक सवाईराम आदि पदाधिकारी उपस्थित होते .