श्रीकांत पिंगळे
नवी मुंबईः ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाव्दारे नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांशी थेट सुसंवाद साधत असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रम अंतर्गत येत्या २२ ऑक्टोबर २०१६ रोजी सानपाडा सेक्टर-१३ मधील मोराज रेसिडन्सी समोरील उद्यान मध्ये महापालिका अधिकार्यांसह सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात महापालिका आयुक्तांकडे तक्रारी/सूचना/संकल्पना मांडण्याची इच्छा असणार्या नागरिकांनी त्या लेखी स्वरूपात आणून सकाळी ६ पासून तेथे उपस्थित असणार्या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.