श्रीकांत पिंगळे
कर्मचार्यांची झाडाझडती…
नवी मुंबई : नवी मुंबईकरांच्या मुंढे पाहिजेतच या आग्रही मागणीपुढे राज्य सरकारला झुकावे लागले असून मुंढेच आता काही महिने पालिका आयुक्तपदी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरसेवकांच्या मानापमानापेक्षा करदात्या नवी मुंबईकरांच्या सादला राज्य सरकारनेही प्रतिसाद दिल्यामुळे आता अनधिकृत बांधकाम करणार्यांचे, फेरीवाल्यांचे तसेच आजवर पालिकेला लुटून स्वत:ची तुंबडी भरणार्या ठेकेदार आणि विशिष्ठ नगरसेवकांचे धाबे निश्चितच दणाणले असणार.
दिवाळीच्या सुट्टी निमित्त महापालिकेला गेले चार दिवस सुट्टी होती. सुट्टी संपून 2 नोव्हेंबर रोजी कर्मचारी कामावर आल्यानंतर अचानक दुपारी महापालिका मुख्यालयातील सर्व विभागांचे हजेरीपट पाहण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासन विभागाचे उपायुक्त सुहास शिंदे यांना दिले. त्यामुळे शिंदे यांनी सर्व विभागात जाऊन हजेरीपटांची छाननी केली. जे कर्मचारी, अधिकारी रजेचा अर्ज न देता अथवा विभाग प्रमुखाला दुरध्वनीद्वारे न कळवता कार्यालयात अनुपस्थित राहिले आहेत, त्यांचा दिवस विनावेतन गृहित धरला आहे. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी प्रशासनाने घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे अधिकारी आणि कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.