श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे “वॉक विथ कमिशनर” या उपक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रात विविध भागातील नागरिकांना भेटून त्यांच्याशी थेट संवाद साधत असून या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शनिवार, दि. 12 नोव्हेंबर 2016 रोजी महापालिका आयुक्त संबंधित अधिका-यांसह ऐरोली रेल्वे स्टेशन परिसर (नागरी वसाहतीकडील बाजू), सेक्टर 3, ऐरोली या ठिकाणी सकाळी 6.30 वा. नागरिकांशी सुसंवाद साधण्याकरीता उपस्थित राहणार आहेत.
तरी जे नागरिक आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना महापालिका आयुक्तांकडे मांडू इच्छितात त्यांनी त्या लेखी स्वरूपात आणाव्यात व सकाळी 6.00 वा. पासून उपक्रम स्थळावर उपस्थित असणा-या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावयाचा आहे.
या टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेत नागरिकांनी त्यांच्याशी थेट संवाद साधत आपले निवेदन त्यांना सादर करावे असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.