नवी मुंबई : आमदार संदिप नाईक यांच्या आमदारनिधीतून ऐरोलीकरांसाठी लवकरच स्केटिंगपार्कची स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार असून सेक्टर ४मध्ये विकसीत होत असलेल्या उद्यानातील या स्केटिंगपार्कच्या कामाचा भुमिपूजन समारंभ आज शुक्रवारी आमदार संदिप नाईक यांच्या शुभहस्ते पार पडला.
स्केटिंगपार्कच्या भुमिपूजन कार्यक्रमास कॉंग्रेसव्या स्थानिक नगरसेविका हेमांगी सोनावणे, कॉंग्रेसचे पदाधिकारी अंकुश सोनावणे, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे तालुकाअध्यक्ष अशोक पाटील, माजी नगरसेवक जी.एस.पाटील, विधानसभा युवकअध्यक्ष राजेश मढवी, शहरसेवादलाचे अध्यक्ष दिनेश पारख, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जब्बार खान, कोळी समाजाचे नेते चंदूदादा पाटील, माजी प्रभागसमिती सदस्य दिपक पाटील, समाजसेवक राजेश गवते आणि स्थानिक रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते.
स्केटिंग हा खेळ ऐरोलीत लोकप्रीय होतो आहे. विशेषतः विद्यार्थ्यामध्ये त्याची जास्त आवड आहे. मात्र स्केटिंगसाठी ऐरोलीत स्वतंत्र जागा नव्हती. त्यामुळे नाईलाजास्तव रस्ते आणि पदपथावर विद्यार्थी स्केटिंग करतात. ही अडचन लक्षात घेत अनेक रहिवाशांनी आमदार नाईक यांच्याकडे स्केटिंगसाठी स्वतंत्र सोय उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती. त्यानुसार सेक्टर ४मध्ये विकसीत उद्यानात ही सुविधा निर्माण करण्याचा निर्णय आमदार नाईक यांनी घेतला. त्याकरीता आमदारनिधीतून १५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
ऐरोलीकरांना स्केटिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करुन देत असल्याबददल आमदार नाईक यांनी समाधान व्यक्त केले. स्केटिंगपार्कच्या जागेवर ओव्हरहेड वायरखाली पूर्वी पाणी साचत असे. दलदल निर्माण होत असे मात्र लवकरच या ठिकाणी सुंदर असे स्केटिंग पार्क साकारणार आहे. त्यामुळे स्केटिंगकरिता सुरक्षित असे ठिकाण ऐरोलीकरांना उपलब्ध होणार आहे. ही सोय ऐरोलीकरांसाठी उपलब्ध करुन दिल्याबददल परिसरातील नागरिकांनी आमदार नाईक यांचे आभार मानले असून स्केटिंगकरीता रस्ते अथवा पदपथांचा वापर आता करावा लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.