राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक यांची मागणी
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबईमधील एका १४ वर्षीय मुलीवर तिच्याच मावस भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आणि संतापजनक प्रकार शनिवारी तळवली येथे उघडकीस आला असून यासंबंधीचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक यांनी केली आहे.
तळवली गावात आईवडील नसल्याकारणाने एकटी राहणार्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मावस भावाने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी मनोज गोतपगार याला अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो (झीेींशलींळेप ेष उहळश्रवीशप षीेा डर्शुीरश्र जषषशपलशी Aलीं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात डॉ. नाईक यांनी रबाळे पोलीस स्टेशनला रविवारी भेट देऊन याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कळशेकर यांच्याशी गंभीर चर्चा केली. हे प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर चालवावे आणि गोतपगारला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. तसेच याप्रकरणी पोलीस आयुक्तांची वेळ घेऊन चर्चा करणार असल्याचे खासदार नाईक यांनी सांगितले.
दरम्यान पीडित मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे समजते. तसेच अधिक तपास सुरु असल्याचे रबाळे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.