जयश्री पाटील /८८७९४८४८३६
नवी मुंबई :- नवी मुंबईतील क्रीडापटूंना संधी उपलब्ध व्हावी आणि इतर ठिकाणच्या गुणवंत खेळाडूंचा खेळ अनुभवता यावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविधपातळींवर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. अशाचप्रकारे अनेकवर्षांपासून सातत्याने नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा वमहानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
यावर्षी 21 डिसेंबर रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात या स्पर्धासंपन्न होत असून सायं. 4.30 वा. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ तसेच रात्रौ 9.30 वा. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्नहोणार आहे. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खा. राजन विचारे, बेलापूर विधानसभा सदस्य आ. सौ. मंदा म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आ. संदीप नाईक, विधानपरिषद सदस्य आ. नरेंद्र पाटील, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील,सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले आणि महापालिका पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रत्येक वर्षी युवकांच्या उत्साही सहभागाने आणि क्रीडारसिकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न होणा-या या स्पर्धेत राज्यातील नामवंत शरीरसौष्ठवपटू सहभागीहोत असल्याने या स्पर्धेचे महत्व वर्षागणिक वाढते आहे. स्पर्धेतून शरीरसौष्ठवपटूंनाव्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असूनस्पर्धेमध्ये राज्यस्तरीय विभागात एकुण 8 वजनी गट व महानगरपालिका क्षेत्रविभागात एकुण 6 वजनी गटांचा समावेश असणार आहे. राज्यस्तरीय गटाकरीतापहिल्या 6 क्रमांकाना व महापालिका क्षेत्र गटाकरीता पहिल्या 5 क्रमांकांना पारितोषिकेप्रदान करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतील अंतिम राज्यस्तरीय महापौर श्री किताब विजेत्यास रु.1,25,000/-तसेच महानगरपालिका क्षेत्र श्री किताब विजेत्यास रु.35,000/- पारितोषिक देऊनगौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बेस्ट पोझर (राज्यस्तरीय) रु.10,000/-, मोस्टइम्प्रुव्हड बॉडी बिल्डर (राज्यस्तरीय) रु.10,000/- अशाप्रकारे गुणवंतशरीरसौष्ठवपटूंना पारितोषिके प्रदान केली जाणार असून गटांतील विजेत्यांसह सर्वविजेत्यांना एकुण रु.4,44,000/- इतक्या रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणारआहेत. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना त्यांच्या पुरस्काराची रक्कम ई-गव्हर्नसच्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल टाकत विजेत्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तरी स्पर्धेत सहभागी शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडाप्रेमी नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. लिलाधर नाईक व उपसभापती श्रीम. श्रध्दा गवस आणि समिती सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे.