जयश्री पाटील /८८७९४८४८३६
** न्यू अवधूत क्रिकेट संघाने पटकावला हिंदूह्द्यसम्राट चषक
नवी मुंबई – खेळाडूंनी सचिन तेंडुलकरसारखा आदर्श घ्यायला हवा.भविष्यात या खेळाडूंमधला एखादा खेळाडू सचिन तेंडुलकर होऊ शकतो असे प्रतिपादन सानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुक्मिणी गलंडे यांनी शनिवारी सानपाडा येथे केले.
शिवसेना व युवासेना सानपाडा प्रभाग क्रमांक ७४ व ७९ यांच्या संयुक्त विद्यमाने सानपाडा सेक्टर ६ येथे शनिवार दि. १७ डिसेंबर व रविवार दि. १८ डिसेंबर असे दोन दिवसीय हिंदूह्द्यसम्राट चषक या प्रकाश झोतातील अंडर आर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांचे उदघाटन सानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुक्मिणी गलंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रुक्मिणी गलंडे बोलत होत्या.क्रिकेट हा चांगला खेळ आहे,याकडे फक्त खेळ म्हणून नव्हे तर करियर म्हणून खेळाडूंनी पहावे असा मोलाचा सल्ला रुक्मिणी गलंडे यांनी खेळाडूंना दिला.
यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख मिलिंद सूर्यराव,उपविभाग प्रमुख रामचंद्र पाटील,भारतीय विद्यार्थी सेना नवी मुंबई शहर चिटणीस विनोद माने, नवी मुंबई व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष विवेक भालेराव,पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण,गणेश पावगे,उपशाखाप्रमुख बाबाजी इंदोरे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. या क्रिकेट सामन्यांत एकूण १६ क्रिकेट संघानी सहभाग घेतला होता. सानपाडा सेक्टर ७ येथील न्यू अवधूत क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला. न्यू अवधूत क्रिकेट संघाला आयोजकांकडून रोख रक्कम ४४४४ रुपये व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सानपाडा सेक्टर १० येथील सत्यम कट्टा या क्रिकेट संघाने व्दितीय क्रमांक पटकावला. सत्यम कट्टा क्रिकेट संघाला आयोजकांतर्फे रोख रक्कम ३३३३ रुपये व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राहुल खरात,उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओमकार टोमपे,उत्कृष्ट खेळाडू म्हणून रोहन पाटील यांना आयोजकांतर्फे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या क्रिकेट सामन्यात सुशांत माने हा मालिकावीर ठरला.सुशांत माने याला सन्मान चिन्ह देऊन आयोजकांकडून गौरविण्यात आले. या क्रिकेट सामन्यांचे आयोजन युवासेना उपशाखा प्रमुख सागर भोईटे व आशिष माने यांनी केले.क्रिकेट सामन्यांचे सूत्र संचालन स्वप्निल देशमुख यांनी केले.