गणेश इंगवले / 8082097775
नवी मुंबई : ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका लागल्या असून सर्वच पक्ष आणि स्थानिक पातळीवरील आघाड्या कंबर कसून राजकीय कुरूक्षेत्रावर उतरल्या आहेत. मात्र गावाकडच्या लढाईत शहरातील बांधवांचेही योगदान असावे म्हणून गावी निवडणूक लढविणार्यांनी शहरातही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानखुर्द येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क शाखेमध्ये सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा तालुक्यामधील मुंबईकर मनसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी उपस्थितांना मनसेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत आणि नवी मुंबई शहर सचिव संदीप गलुगडे यांनी निवडणूकीच्या रणनीतीविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये कमालीचा जोश पहावयास मिळाला. या बैठकीमध्ये शिराळा तालुक्याच्या सर्वच्या सर्व जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढवून त्या जिंकण्याचा निर्धारदेखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला वाकुर्ड , शिरसी, पणुब्रे, गिरजावड़े, चरण, खेरेवाड़ी, सावंतवाड़ी, बेलेवाड़ी, सय्यदवाड़ी, बेर्डेवाड़ी,खिरवड़े, हातेगाव, बेंगड़ेवाड़ी, घागरेवाड़ी, वाकईवाड़ी, कुसलेवाड़ी, कदमवाड़ी, मणदूर, काळून्द्रे,चरण गावातील शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.