वाशी गावातील ग्राम सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
साईनाथ भोईर / नवी मुंबई
शुक्रवार दिनांक १० मार्च २०१७ नवी मुंबई भूमिपुत्र चळवळी मधील पुन्हा मैलाचा दगड ठरला. जुहूगाव ,घणसोलीगाव ग्रामस्थांच्या ग्रामसभेच्या पावला वर पाउल ठेवत हजारोंच्या संख्येने वाशिगाव ग्रामस्थांनी हि या ग्रामसभेला उपस्थिती नोंदवत चळवळी वरचा आपला विश्वास अधिक दृढ केला.
ह्या ग्रामसभेत चळवळी वरच्या कवितांनी दाद तर मिळवली., पण भूमिपुत्रांची आजची विदारक परिस्थिति गुनाबाई सुतार यानी उपस्थितासमोर मांडून उपस्थितांची चांगलीच दाद मिळवली. महिलांना या चळवळीची जबाबदारी आपली असून, खंबीर पणे चळवळीत सामील होण्यासाठी आवाहन केले. श्री निलेश पाटील ह्यांनी हि ह्या निर्णायक लढ्यात वाशिगाव ग्रामस्थांची साथ महत्वाची ठरणार असून, प्रत्येक गावाने आपापली जाबाबदारी गांभीर्याने आणि नियोजन बद्ध पार पाडल्यास लढा जिंकल्याशिवाय राहणार नाही असे खंबीर मत व्यक्त केले
आजच्या ग्रामसभेस नवी मुंबई कोंग्रेस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत,निशांत भगत,नगरसेविका वैजयंती भगत,फशिबाई भगत,रुपाली भगत,सुनील सुतार आगरी कोळी यूथ फाउंडेशन चे अध्यक्ष नीलेश पाटील यांच्या सह अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला भगिनी, आणि तरुण हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.