माजी नगरसेवक रतन मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील रहिवाशांना भेट
योगेश शेटे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रभागामध्ये रस्ते, चौक व उद्यानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. बाह्य सुरक्षेसोबत प्रभागातील सोसायटी आवारातील सुरक्षाही तितकीच महत्वाची असल्याने नेरूळ प्रभाग 87 मधील शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अंर्तगत भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. प्रभाग 87 मधील माजी नगरसेवक व माजी पक्षप्रतोद रतन मांडवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 7 एप्रिल रोजी प्रभागातील ग्रीनफिल्ड व संजीवनी अपार्टमें या दोन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कार्याचा शुभारंभ बेलापुर विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रभागातील सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देताना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी प्रभागातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारामध्ये अंर्तगत भागात स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात नगरसेविका मांडवे यांनी प्रभागातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांना लेखी पत्रव्यवहार करून चर्चा व बैठकांना शुभारंभही केला. या प्रभागातील माजी नगरसेवक व शिवसेनेचे माजी पक्षप्रतोद रतन मांडवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शुक्रवारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या अभियानाचा दोन सोसायट्यांमध्ये शुभारंभही करण्यात आला.
रतन मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ सेक्टर 8, एल मार्केट येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात बेलापुर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, शहरप्रमुख विजय माने, महिला शहर संघठक सौ. रोहिणी भोईर, उपशहरप्रमुख गणपत शेलार, विभागप्रमुख गणेश घाग, संजय जाधव यांनी भाषण करताना नेरूळ सेक्टर 8 व दहा परिसराच्या विकासाकरिता करत असलेल्या कार्याबद्दल मांडवे दांम्पत्यांचे कौतुक करत जनतेच्या हितासाठी स्वखर्चाने सुविधा पुरविण्याचे काम केवळ शिवसेना व शिवसैनिकच करू शकतो. मांडवेसारखा शिवसैनिक 80 टक्के समाजकारण या संघटनात्मक घटनेचे पालन करत असल्याचे सर्वच वक्त्यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, महिला विभाग संघठक सौ. सत्वशीला जाधव, नगरसेवक सोमनाथ वासकर, काशिनाथ पवार, रंगनाथ औटी, प्रशांत पाटील, दिपक पवार, माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर, दिलीप घोडेकर, वाई तालुका संपर्कप्रमुख अशोक मुंगसे, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, राजेश पुजारी, दिपक शिंदे, दिलीप आमले, समाजसेवक प्रल्हाद पाटील, अभयचंद्र सावंत,युवा सेनेचे नवी मुंबई अधिकारी मयुर ब्रीद, बेलापुर विधानसभा उपयुवा अधिकारी निखिल मांडवे यांच्यासह शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी , गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.