*शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला मात्र केराची टोपली*
*MGM शाळेने RTE प्रवेशाला दिला होता नकार*
दि. २४ मार्च २०१७ पासून RTE अंतर्गत दुसऱ्या प्रवेश यादीत नाव येऊन ही नेरूळ येथील MGM शाळेने विद्यार्थ्यांना Jr.KG. ला प्रवेश देण्यास पालकांना स्पष्ट नकार दिला होता. याचसंदर्भात तक्रारी आल्यांनतर दि.०४ एप्रिल रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी MGM शाळा प्रशासनाला मान्यता रद्द करू अशी नोटीस दिली होती. मात्र मुजोर MGM शाळा प्रशासनाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या या नोटीसीला केराची टोपली दाखवली होती. आज दि.०८ एप्रिल ही प्रवेशाची अंतिम तारखेची मुदत असून देखील या विद्यार्थ्यांना MGM शाळेने प्रवेश दिला नव्हता. अखेर आज दि.०८ एप्रिल रोजी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली, पालकांच्या उपस्थितीत, मनसेने MGM शाळेच्या प्रशासनाला घेराव घातला व त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी केली. तसे न केल्यास कॅबीन मध्येच कोंडून ठेऊ असा इशारा यावेळी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला. यावेळी उपस्थित केंद्र समन्वयक आत्माराम मिरकुटे व शाळा प्रशासन अखेर मनसेच्या या रौद्र रुपा समोर झुकले व या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. यावेळी उपस्थित पालकांनी या दोन तासांमध्ये आपल्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया देखील पूर्ण केली.
याप्रसंगी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पालकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शाळेने RTE अंतर्गत प्रवेश देण्यास अडचण निर्माण केल्यास त्वरित मनसेला या 9664278717, 9664848007 या क्रमांकांवर संपर्क करावा. नवी मुंबईत RTE प्रवेशास शाळा नकार देण्याची ही दुसरी घटना आहे. या अगोदर DPS शाळेने ५० विद्यार्थ्यांना RTE २५% टक्के अंतर्गत प्रवेश नाकारला होता. त्यावेळी देखील मनसेच्या दणक्यामुळे DPS शाळा नरमली होती व त्यांनी प्रवेश दिला होता. यातून शिक्षणधिकाऱ्यांनी धडा घ्यावा व आपला वचक कायम ठेवावा असे देखील मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या समवेत विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, रोजगार विभागाचे अप्पासाहेब कोठुळे, विभाग अध्यक्ष सचिन कदम, अभिजित देसाई, उपविभाग अध्यक्ष शिवम कवडे, शाखा अध्यक्ष विराट शृंगारे, सागर नाईकरे, सागर घोडेकर, विनायक पिंगळे, मंदार घरत व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.