नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या झोपा उडाल्या असून शिवसेनेचे माजी नगरसेवक व माजी पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे यांच्या नावाने शिमगा घालण्याचा उद्योग संबंधित नगरसेवकांनी सुरू केला आहे. त्याला कारणही तसेच आहे. नवी मुंबईच्या राजकीय क्षेत्रात वावरणार्यांना रतन मांडवे हे नाव चांगलेच परिचित आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. शाळांना सुट्ट्या पडून लहान मुले आणि त्यांच्या घरातील महिला गावी निघून गेले आहेत, तर काही जण आठवडाभरात गावी निघून जातील. पुरूषांना संसाराचा गाडा हाकायचा असल्याने व कामावर रजा मिळत नसल्याने दिवसभर कामावर जायचे आणि संध्याकाळी घराच्या राखणाकरता परतायचे हा दरवर्षी कार्यक्रम करावाच लागतो. याच कालावधीत घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होते. इमारतींमध्ये सरसकटपणे घरे बंद असल्यामुळे पाळत ठेवून घरफोडीचे काम बिनबोभाटपणे चोरट्यांकडून होत असते. नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून प्रभाग क्रं. ८७ मधील रस्त्यावर, चौकांमध्ये, उद्यानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. प्रभागात महापालिका प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत यासाठी मांडवे दांपत्याकडून गेली ७ वर्षे पालिका प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. सध्या सौ. सुनिता रतन मांडवे या प्रभागाच्या नगरसेविका आहेत. त्यापूर्वी महापालिकेच्या चौथ्या सभागृहात रतन नामदेव मांडवे या पाच वर्षे या प्रभागात नगरसेवक म्हणून कार्य केले आहे. रतन मांडवेंचा त्यांच्या कालावधीतील पाठपुराव्याला सुनिता मांडवेंनी नेटाने गती दिली आणि पालिका प्रशासनाला या मागणीची अखेर दखल घ्यावी लागली. प्रभागाच्या सुरक्षिततेला रतन मांडवे आणि सुनिता मांडवे या दांपत्याने सातत्याने प्राधान्य दिले आहे. प्रभागातील बाहेर सुरक्षेेचे काम पालिका प्रशासनाने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून निश्चितच होईल. पण गृहनिर्माण सोसायट्यांच्या आतील सुरक्षा व्यवस्थेचे काय हा प्रश्न रतन मांडवे आणि सुनिता मांडवे यांच्यापुढे निर्माण झाला. रतन मांडवे यांनी तात्काळ स्वखर्चातून प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अर्ंतगत भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णय घेतला नाही तर त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नही सुरू केले. सर्व गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकार्यांना मांडवे दांपत्यांकडून निवेदनपत्र सादर करण्यात आले. सोसायटी अर्ंतगत भागात आम्ही स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवित असून आपण त्यासाठी परवानगी द्यावी असे त्या निवेदनपत्रात स्पष्टपणे नमूदही करण्यात आले. गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकार्यांनी व त्या त्या सोसायट्यांतील रहीवाशांनीही मांडवेंच्या संकल्पनेचे उत्स्फूर्त स्वागत केले. मांडवेंना सोसायटी आवारात बैठकीसाठी बोलाविण्यात येवू लागले. ७ एप्रिल हा रतन मांडवेंचा वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागातील दोन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाचा शुभारंभही झाला. शिवसेनेचे बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोेरे व शिवसेना बेलापुर शहरप्रमुख विजय माने यांच्या हस्ते हा शुभारंभाचा कार्यक्रम करण्यात आला. अर्थात स्वखर्चाने प्रभागात विकासकामे करण्याची रतन मांडवे यांची ही पहिलीच वेळ नाही. मांडवे यांच्या नगरसेवकपदाच्या कालावधीत सिडकोच्या सोसायट्यांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. तथापि निधी कमी पडल्याने चार ते पाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसू शकले नाहीत. प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉकच्या बाबतीत कोठेही अनुशेष राहू नये याकरिता रतन मांडवेंनी पुढाकार घेत संबंधित चार ते पाच गृहनिर्मांण सोसायट्यांमध्ये स्वखर्चाने पेव्हर ब्लॉक बसवूनही टाकले. मांडवे यांच्या स्वखर्चातून प्रभागातील गृहनिर्माण सोसायटी आवारात सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्याच्या संकल्पनेची सध्या नवी मुंबई कार्यक्षेत्रात चर्चा सुरू आहे. मांडवेंच्या उपक्रमाचे नवी मुंबईकरांकडून उत्स्फूर्त स्वागत केले जात असताना दुसरीकडे जे काम मांडवे करू शकतात, ते काम करण्याचे आपल्या नगरसेवकाला सुचत नाही का, अशी नाराजी प्रभागाप्रभागातील नवी मुंबईकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नेरूळमध्ये तर या चर्चेने गती घेतली आहे. नेरूळ पूर्वेला आणि पश्चिमेला तर असलेले अधिकांश नगरसेवक रतन मांडवे तुलनेत कित्येक पटीने श्रीमंत आहेत. मांडवे प्रभागातील सुरक्षेला प्राधान्य देताना स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवू शकतात, मग मांडवेंपेक्षा दहा ते वीस पट श्रीमंत असलेल्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांतील सुरक्षा व्यवस्थेशी काही देणेघेणे आहे का नाही असा संतप्त सवाल गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशी, महिला व युवा पिढी आपसातील चर्चेमधील विचारू लागले आहेत. काही नगरसेवकांनी तर खासगीमध्ये बोलताना मांडवेंच्या उपक्रमाबाबत नाराजी व्यक्त करत यामुळे आता आम्हाला खर्च करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली. गतसभागृहातही मांडवेंनी स्वखर्चाने चार ते पाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविल्याचे दाखले नेरूळवासियांकडून पुन्हा देण्यात येवू लागले आहेत. मांडवे जे औदार्य दाखवितात, ते अन्य नगरसेवक का दाखवित नाहीत, असा सूर आता नवी मुंबईकरांकडून आळविण्यात येवू लागला आहे. सध्या मांडवे नवी मुंबईकरांच्या तसे नवी मुंबईतील नगरसेवकांच्या प्रकाशझोतात आले आहेत. चांगल्या गोष्टीला कोठेतरी ग्रहण हे लागतेच. चांगल्या गोष्टी पाहवत नसल्याने इतरांना पोटदुखी होणे स्वाभाविकच आहे. प्रभाग ८७ मधील मांडवेंच्या मागे असलेला जनाधार ही बाबही आता लपून राहीेलेली नाही. त्यामुळे मांडवे अन्य विरोधी पक्षीयासोबत शिवसेना संघटनेतील हितशत्रूही त्रास देण्यास आघाडीवर असल्याचे नेरूळवासियांना गेल्या दोन वर्षात जवळून पहावयास मिळालेले आहे. मांडवेंच्या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेतीलच आजूबाजूची काही मंडळी गेल्या दोन वर्षापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला सर्वांनाच माहिती आहे. ज्यांना स्वत:चे निवासी प्रभाग राखता आले नाही, विधानसभा निवडणूकीत ज्यांना शिवसेना उपनेते विजय नाहटा यांना मताधिक्य देता आले नाही, त्यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्याचे सोडून ज्ञानामृत पाजण्याचे काम करताना स्थानिक रहीवाशांमध्ये स्वत:चे हसे करून घेतले आहे. मांडवे परिेवार विकास कामांसाठी अहोरात्र झटत असल्याने व वेळ पडल्यास घरातील पैसाही टाकत असल्याने स्थानिक रहीवाशांमध्ये मांडवे परिवाराची एक आगळीवेगळी प्रतिमा निर्माण झाल्याने संघटनेतील काही लोकही माकड चाळे करत मांडवेंना त्रास देत आहेत. पण परिसरातील जनता हे सर्व ओळखून असल्याने स्थानिक लोकच या प्रकाराबाबत चीड व्यक्त मांडवे परिवाराच्या मागे आपण खंबीरपणे असल्याचे मांडवे परिवाराला सांगत आहे. मांडवेंनी स्वखर्चाने सोसायटी आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवित प्रभागातील सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देत आपण आपल्या प्रभागाप्रती मनापासून काम करत असल्याचा एक आदर्श आपल्या कृतीतून निर्माण केला आहे. आता इतर नगरसेवक कधी याचे अनुकरण करतात, हे लवकरच पहावयास मिळणार आहे.
– श्रीकांत पिंगळे