सुलभ शौचालयाचा प्रस्ताव अखेर महापालिका प्रशासनाने बासनात गुंडाळला
नवी मुंबई / योगेश शेटे
घणसोली प्रभाग क्र.३५ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या शौचालयास घरोंदावासीय नागरिकांचा तीव्र विरोध आहे. मैदान सुशोभीकरण आणि सुलभ शौचालयाच्या भूमिपूजन समारंभास शिवसेना उपनेते विजय नहाटा उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका आणि पदाधिकारी यांच्या अट्टहासामुळे गरज नसतानाही सुलभ शौचालयाचा घाट त्याठिकाणी घातला जात होता. त्याविरोधात घरोंदावासीय नागरिकांनी प्रथमच उत्सुर्फपणे सह्यांची मोहीम राबविली आणि ७०० ते ८०० सह्या घरोंदा मधील सहा सोसायट्यांमधून संकलन केल्या. त्यानंतर रविवार दि. ०९ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळी घरोंदावासीय नागरिक काळ्या फिती लावून उपस्थित राहिले आणि विजय नहाटा यांची गाडीच कार्यक्रमस्थळी अडवून सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली आणि सुलभ शौचालयाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम स्थानिक लोकप्रतिनिधींना बासनात गुंडाळावा लागला.
सोमवारी सर्व घरोंदा वासीय आणि सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी परिमंडळ २ चे उपायुक्त अमरीश पटनिगरे यांची भेट घेऊन सदरच्या शौचालयास विरोध असल्याचे निवेदन आणि सह्यांचे निवेदन दिले. त्याप्रसंगी उपायुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि उपस्थित शिष्टमंडळाचे समाधान केले.
सदरच्या सर्व घडामोडीत सर्व पक्षीय पदाधिकारी मनसे नवी मुंबई शहर सचिव संदीप गलुगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्डअध्यक्ष आनंदराव तरटे, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस विजय खोपडे, राष्ट्रवादी युवक निलेश पवार, सिद्धेश्वर को.ऑप. हौसिंग सोसायटी मधील खुशालराव जाधव, संतोष ढोले, अनिल चव्हाण, सिद्धिविनायक को-ऑप हौसिंग सोसायटीमधील विनोद शिंदे, महेंद्र खिल्लारी, युवराज औधडे, बाळकृष्ण जाधव, मानसिंग घाडगे, प्रकाश करमळकर, नवनाथ सरजिने, आदर्श को-ऑप हौसिंग सोसायटी मधील प्रमोद साळुंखे, शिवाजीराव पाटील, एफ टाईप को-ऑप हौसिंग सोसायटी मधील ध्यानदेव खणकर, माणिकराव बोराडे, शत्रुघ्न पडवळ, ओंकार को-ऑप हौसिंग सोसायटीमधील श्याम सुंदर पवार, बाळासाहेब जाधव, भाजप तालुका उपाध्यक्ष श्याम सराफ, दिनेश माने, भागवत खेडकर आणि श्री गणेश को-ऑप हौसिंग सोसायटी मधील सागर औटी आणि बाजीराव खामकर यांनी सर्वांनी योगदान दिले.