नगर सेवक लीलाधर नाईक यांच्या स्तुत्य उपक्रम
नवी मुंबई / साईनाथ भोईर
कार्ला गडावर भरणाऱ्या एकविरा देवीच्या यात्रेला नवी मुंबईतील बोनकोडे येथील नगरसेवक लीलाधर नाईक यांनी समाजसमोर नवा आदर्श ठेवला आहे.नाईक आणि त्यांच्या ६० जणांच्या टीमने एकविरा देवीच्या यात्रेवेळी जवळजवळ ७०० ते ८०० गोणी प्लास्टिक कचरा गोळा करून यात्रेला येणाऱ्या आगरी कोळी समाजबांधवांसमोर नवा आदर्श मंडला आहे. लोणावळा येथील कार्ला गडावरील एकविरा देवी ही संबंध आगरी कोळी बांधवांचे दैवत म्हणून ओळखले जाते.चैत्र पौर्णिमेला येथे देवीची जत्रा भरते.या जत्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून आगरी कोळी बांधव तसेच इतर जातीय बांधव देवीचे दर्शन घेण्यास येत असतात.येथे येणारे बांधव हे फक्त देवीच्या उत्सवाला आणि जत्रेला येत असतात.मात्र येथे येताना आपल्यासोबत हलघेऊन येणारे प्लस्टिकच्यावस्तू प्लेट्स,चहाचे कप,ग्लास, वाट्या,पाण्याच्या बाटल्या, वेफर्सची पाकिटे या वस्तू तिथेच टाकली जातात. हही समस्या लक्षात घेऊन यात्रेला आलेल्या नगरसेवक लीलाधर नाईक आणि त्यांच्या सोबत असलेल्या ६० जणांच्या टीमने आपल्यासोबत १००० गोणी आणल्या होत्या.नाईक याबाबत म्हणाले की आम्ही आणलेल्या गोण्या त्यामानाने अमच्याबाबततीत पुरेशा होत्या मात्र संपूर्ण गडाच्या स्वच्छतेसाठी मात्र फारच तुटपुंज्या निघाल्या.तआम्ही एका दिवसांत १००० गोण्यांपैकी ७०० ते ८०० गोण्या कचरा गोळा केला.व तो तेथेच असलेल्या दडम्पिंग ग्राउंड वर टाकला.वेळेअभावी आम्हाला इतकाच कचरा गोळा करता आला.मात्र संपूर्ण गडावर असलेला कचरा गोळा करण्यास तब्बल २० ते २२ दिवस लागतील इतका कचरा तेथे जमा झलेला आहे.मात्र आम्ही एक प्रकारे देवीची सेवाच केली आहे आई मानतो.या उपक्रमामुळे आम्हाला अनेक ठीकाणांहून फोन येऊ लागले आहेत.तसेच आम्हाला यापुढे देखील असे उपक्रम करताना कळवा असे सांगितले जात आहेत.लोक या स्वछता मोहिमेमुळे अमच्याशी जोडले जात आहेत.यापुढे आमचा मानस आहे तो गडावर स्वछता राखा असे आवाहन करणारे फलक लावण्याचा आणि तजीक ठिकाणी कचरा पेट्या लावण्याचा जेणेकरून गडाची स्वछता राखण्याचा.तसे नियोजन आम्ही करत आहोत.मात्र खंत एकच वाटते गडावर स्वछता करताना आम्हाला लोकांनी कुतूहलापोटी विचारले तुमची संस्था कोणती वगैरे मात्र मदतीला पुढे कोणीही आले नाही.मात्र या सगळ्यांना नाईक आणि त्यांच्या टीमने आपली खरी ओळख लपवून ‘मानवता आणि स्वछता’ हीच आमची संस्था आहे.नगरसेवक नाईक यांनी आपल्या विभागात देखील यापुढे आशा मोहीम आखल्या जातील असे या निमित्ताने पुण्यमगरीशी बोलताना सांगितले आहे.
या मोहिमेमुळे नगरसेवक हा पहिला समाजसेवक असतो हे नाईक यांनी आपल्या कार्यमधून नवी मुंबईमध्ये दाखवून दिले आहे.