नवी मुंबई / साईनाथ भोईर
नवी मुंबई कोपरखैरणे येथे कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा रंगणार आहे. ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरुष आणि महिलांचे संघ यात असणार आहेत. 13 ते 16 एप्रिल असे 4 दिवस सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे सामने चालणार आहेत.या समन्यांमुळे नवी मुंबईकरांना कबड्डीचा थरार अनुभवयास मिळणार आहे.यात पुरुषांचे एकूण आठ संघ व महिलांचे 4 संघ सहभागी होणार असून यंदा प्रथमच महिलांच्या संघांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. या संघांना नवी मुंबईतील विविध भागांची नावे देण्यात आल्याने आपल्या विभागातील संघ जिंकावा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यात वाशी वॉरीयार्स,नेरूळ रायडर्स,बेलापूर ब्रेकर्स,सानपाडा स्टार्स,कोपरखैरणे किंग्स,ऐरोली स्ट्रायकर्स,घणसोली फायटर,बोनकोडे बुल्स असे आठ पुरुषांचे आणि 4 महिलांचे संघ असणार आहेत.नवी मुंबईच्या खेळाडूंना वाव मिळण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई अध्यक्ष आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आके आहे असे कार्याध्यक्ष देवा म्हात्रे यांनी माहिती देताना सांगितले